आज दिनांक २८ एप्रिल २०२० रोजी पाटील इस्टेट , शिवाजी नगर या वस्तीत ३८३ व्यक्तींचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये ५ संशयित रुग्ण आढळून आले. त्याची माहिती शासकीय यंत्रणेला कळवली.
नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद होता. नागरिकांना होमिवोपथी औषधे व मास्क चे वाटप करून काळजी घेण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. नंतर परिसरातील तरुण कार्यकर्ते आपण होवून भेटले व उद्या उपक्रमाला सहकार्य करू असे सांगितले.
डॉक्टर रोहित काशीकर व ७ कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले.
आजच्या उपक्रमात पुणे महानगर प्रचारक सुनील जी साठे, प्रांत कार्यालय व्यवस्था प्रमुख भरत देशपांडे, परमहंस नगर सह कार्यवाह आमोद कलगावकर , पुणे महानगर बौद्धिक मंडळ सदस्य डॉ. प्रशांत दुराफे सहभागी झाले.महानगर तरुण व्यवसायी प्रमुख आनंद कुलकर्णी पूर्णवेळ थांबून समन्वय करीत आहेत.सेवा प्रमुख महेश मानेकर यांनी कार्यकर्ते प्रशिक्षण केले.
आज प्रांत प्रचारक श्री यशोवर्धन वाळिंबे व महनगर सहकार्यवाह महेश पोहनेरकर यांनी भेट दिली.