आपल्या सेवावस्त्या आणि कोरोना.. कसबा भाग,पुणे

30 Apr 2020 10:53:02

kasba_1  H x W:
 
सेवा वस्ती व चाळीत घर लहान - माणसे जास्त , दाट वस्ती , मोकळ्या जागा कमी, सार्वजनिक शौचालय अस्वच्छ जास्त व स्वच्छ कमी अशा ठिकाणी आपण अनेकजण वाढलो,मोठे झालो. या सेवावस्तीने आपल्याला जीवनशिक्षण दिले.
 
पण आता कोरोना संकट आपल्या तोंडापाशी येऊन थांबले आहे.
 
यावर समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळाली ती म्हणजे पुणे महानगर पालिका आणि रा.स्व. संघ , जनकल्याण समिती तसेच स्वरूपवर्धिनी यांच्या सहयोगाने दिनांक २७/४/२०२० रोजी कसबा परीसरा मधील मंगळवार पेठ आणि संघ रचनेतील एक वस्ती गाडीतळ व त्या अंतर्गत २ उपवस्त्या
 
अ) भीमनगर आणि ब) शाहू अभ्यासिका
 
या ठिकाणी कोरोना च्या पार्श्वभूमीवर एकूण ७७७ व्यक्ती म्हणजे ३७८ महिला आणि ३९९ पुरुष स्क्रिनिंग टेस्ट करून कार्याला सुरुवात झाली. असेच कार्य सुरू राहणार आहे.
 
नागरिकांमध्ये थोडे भीतीचे वातावरण आहे पण त्यांच्याशी शांत पणे समजून सांगितल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला.
ठरल्या प्रमाणे भारतीय जैन संघटनेने दोन्ही दिवस वेळेत अँम्ब्युलेन्स बरोबर औषधे पुरवली.
 
या कार्यात अनेक सेवाभावी डॉक्टर आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत.
 
या सर्व उपक्रमामुळे स्थानिक लोकांमध्ये एक प्रकारचे उत्साही वातावरण तयार झाले.
 
यामध्ये महत्वाचे म्हणजे एकूण १० व्यक्ती संशयित आढळल्या त्यानुसार महानगरपालिकेने त्यांची रचना केली. या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता सर्व समाज प्रेमी नागरिकांचे स्वागत 🙏
 
२८-एप्रिल-२०२०
 
शेवटी एकच विचार नम्रतेने मनात येतो की नेहमीप्रमाणे....
 
मायभूमीच्‍या कणाकणाचे प्रेम आमचे प्राण पणाचे मायभूमीची सर्व लेकरे समान आम्हा प्यारी रे
🚩🚩 भारत माता की जय 🚩🚩
 

kasba_2  H x W: 
Powered By Sangraha 9.0